नागपूर -दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज पुन्हा सूर्यनारायनाणे आग ओकण्यास सुरुवात केली आहे. आजचा दिवस या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. आज वर्धेचं तापमान 46.5 डिग्री इतके नोंदवण्यात आले आहे, महत्त्वाचे म्हणजे गेल्या 24 तासात वर्धेच्या तापमानात 3.5 डिग्रीने वाढले आहे. आज विदर्भातील दोन जिल्ह्यांचे तापमान 46 डिग्रीच्या पुढे गेलं आहे तर पाच जिल्ह्यांचे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदव्यात आले आहे.
विदर्भावर सूर्यनारायणाची वक्रदृष्टी; वर्धेचं तापमान 46.5 डिग्री वर - वर्धा जिल्हा तापमान बातमी
मार्च महीन्याच्या पहील्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्यात तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान तापमानाने 45 डिग्रीपर्यंत गेले होते. मात्र,आज सूर्य आपल्या पूर्ण क्षमतेने तळपला आल्याने तापमानने या मौसमातील उच्चांक गाठला आहे. पाऊस सुरू होण्यास साधारणपणे महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विदर्भाच्या जनतेची चिंता वाढली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज खरा -आज पासून विदर्भाच्या तापमानात वाढ होईल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने आधीच वर्तवली होती,त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. असानी चक्रीवादळाचा प्रभाव ओसारताच सूर्य अधिक प्रखरतेने तळपायला लागला आहे. आज दुपारच्या वेळेत तापमानात तब्बल तीन डिग्रीची वाढ नोंदवण्यात आली आहे. पुढील काही दिवस नागरिकांना अश्याच प्रकारे उन्हाचे चटके सहन करावे लागतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तापमानाने गाठला उच्चांक -मार्च महीन्याच्या पहील्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्यात तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान तापमानाने 45 डिग्रीपर्यंत गेले होते. मात्र,आज सूर्य आपल्या पूर्ण क्षमतेने तळपला आल्याने तापमानने या मौसमातील उच्चांक गाठला आहे. पाऊस सुरू होण्यास साधारणपणे महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विदर्भाच्या जनतेची चिंता वाढली आहे.
शनिवारी विदर्भात नोंदवलं गेलेलं तापमान
अकोला- ४४.६ अंश सेल्सिअस
अमरावती-४४.८ अंश सेल्सिअस
बुलडाणा-४०.७ अंश सेल्सिअस
चंद्रपूर- ४६.०२ अंश सेल्सिअस
गडचिरोली-४१.४ अंश सेल्सिअस
गोंदिया - ४३.८ अंश सेल्सिअस
नागपूर- ४५.४ अंश सेल्सिअस
वर्धा-४६.०५ अंश सेल्सिअस
वाशीम - ४३.५ अंश सेल्सिअस
यवतमाळ-४५.० अंश सेल्सिअस