महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 27, 2019, 5:35 PM IST

ETV Bharat / city

जुगार खेळणे बितले जीवावर: पोलीस पकडतील या भीतीने नाल्यात घेतली उडी; नागपुरातील दोघांचा मृत्यू

पोलिसांचा छापा पडणार असल्याचे समजताच चार जुगाऱ्यांनी पोलीस पकडतील या भितीने जवळच्या नाल्यात उडी घेतली. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना नागपूर शहराबाहेरील बहादुरा गावाशेजारी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

दोघांचा मृत्यू

नागपूर- जुगार खेळत असताना पोलिसांचा छापा पडणार असल्याचे समजताच चार जुगाऱ्यांनी पोलीस पकडतील या भितीने जवळच्या नाल्यात उडी घेतली. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना नागपूर शहराबाहेरील बहादुरा गावाशेजारी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी शोध घेतला असता दोन्ही मृतदेह मिळून आले.

पोलीस आपल्याला अटक करतील या भीतीने जुगरींनी ज्या दिशेने वाट मिळाली त्या दिशेने पळ काढला. त्यापैकी 4 जणांनी नाल्यात उडी घेतली. त्यापैकी दोघांना नाल्याबाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र, दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी पोलिसांना माहिती समजताच त्यांचा शोध सुरू केला. त्यात एकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर काही वेळाने दुसराही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. नागपूर पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई सुरु केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details