महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Crime : नागपुरात धारधार शस्त्र घेऊन खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

लकडगंज परिसरातील वर्धमान नगर चौकातील दुकानात तीन गुंड धारधार शस्त्र घेऊन घुसले. गुंडांनी दुकान मालकाकडे 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. एवढंच नाही तर दर महिन्याला 10 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,अन्यथा येथे व्यवसाय करता येणार नाही, अशी धमकी दिली. पैसे देण्यास दुकानदाराने नकार दिल्यानंतर आरोपी गुंड निघून गेले. मात्र थोड्या वेळात हातात शस्त्र घेऊन परत दुकानात आले. त्यांनी दुकानात तोडफोड केली.

लकडगंज पोलीस स्टेशन
लकडगंज पोलीस स्टेशन

By

Published : Feb 15, 2022, 3:47 PM IST

Updated : Feb 15, 2022, 4:00 PM IST

नागपूर -नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका दुकानात खंडणीसाठी शस्त्र घेऊन घुसलेल्या गुंडांनी दुकानात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. गुंडांनी धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही गुंडांवर या आधी सुद्धा खंडणीसाठी धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत.

प्रतिक्रिया देतांना पोलीस निरीक्षक

लकडगंज परिसरातील वर्धमान नगर चौकातील दुकानात तीन गुंड धारधार शस्त्र घेऊन घुसले. गुंडांनी दुकान मालकाकडे 10 हजार रुपयांची खंडणी मागितली. एवढंच नाही तर दर महिन्याला 10 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,अन्यथा येथे व्यवसाय करता येणार नाही, अशी धमकी दिली. पैसे देण्यास दुकानदाराने नकार दिल्यानंतर आरोपी गुंड निघून गेले. मात्र थोड्या वेळात हातात शस्त्र घेऊन परत दुकानात आले. त्यांनी दुकानात तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. अनवर खान आणि योगेश पवार, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

आरोपी पूर्वीचे खंडणीखोर

लकडगंज पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी नागपूर शहरा लगतच्या भागातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर या आधी सुद्धा खंडणी,धमकवणे या सारखे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा -कुंपणच खाते शेत... गांजाची तस्कर करणारा निघाला पोलीस कर्मचारी; छत्तीसगड पोलिसांची कारवाई

Last Updated : Feb 15, 2022, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details