नागपूर -नागपूर महानगर पालिकेतील भाजपाचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी चोरट्यानी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी तब्बल 90 किलो वजनाची अख्खी तिजोरीच पळवली आहे. या घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागपूर महापालिकेतील श्रीमंत नगरसेवक म्हणून गवई ओळखल्या जातात. सेमीनरी हिल्सच्या मालाबर हिल परिसरात त्यांचा आलिशान बंगला आहे. याठिकाणी ते कुटुंबासह राहतात. नगरसेवक संदीप गवई हे कुटुंबासह मुंबईला गेले असताना काही अज्ञात चोरट्यांनी 90 किलो वजनाची तिजोरीच पळवली आहे. त्या तिजोरीमध्ये 32 लाखांच्या स्वर्ण आभूषण असल्याचा अंदाज आहे.
बंगल्यावर पाळत ठेवून केली चोरी