नागपूरआपला राष्ट्रध्वज तिरंगा (Har Ghar Tiranga) म्हणजे देशाचा अभिमान,अस्मिता आणि सन्मान आहे. तिरंगा ध्वज दिसताचं उर कसा अभिमानाने भरून येतो. आणि त्यातल्या त्यात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी (Indian Independence Day) तर राष्ट्रप्रेमाची भावना तिरंगा ध्वजामुळे आणखी द्विगुणित होते. मात्र, आपल्या तिरंगा ध्वजारोहणा मागे देखील एक रोचक तथ्य लपलेले आहे; या बाबत मात्र अनेकांना कल्पना नसेल. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण (the flag on 15th August and 26th January) हे दोन वेगळ्या पद्धतीने (different rules for hoisting the flag) करण्याचा नियम आहे. हा नियम काय सांगते, हे आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.
आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा तीन रंगानी मिळून तयार झाला आहे. ज्यामध्ये सर्वात वर भगवा मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. ध्वजाच्या अगदी मध्ये निळ्या रंगाचा रंगाचे अशोक चक्र आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. हा राष्ट्र ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केला आहे.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ध्वजारोहणातील फरकस्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्टला तिरंगा झेंडा हा दोरीच्या मदतीने खालून वर ओढला जातो, त्यानंतर ध्वजारोहण केले जाते. मात्र, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज खालून वर ओढला जात नाही; तर तो वरच्या बाजूला बांधला जातो, मान्यवरांच्या हस्ते दोरीला एक झटका दिला जातो तेव्हा ध्वजारोहण होते.