महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उत्पन्न आणि खर्चाची घडी बिघडली, नागपूर मनपाने निवडला 'सीएनजी' मार्ग - Nagpur city

इंधनाचे दर सध्या नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सर्व सामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. यामुळे नागपूर महापिलिकेत सध्या कर स्वरूपात मिळणारे उत्पन्न आणि खर्चाची घडी बसत नाही. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने काटकसरीचा मार्ग निवडला आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेकडे असलेल्या सर्व गाड्यांना सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर मनपाचा गाड्या सीएनजी चालवण्याचा निर्णय
नागपूर मनपाचा गाड्या सीएनजी चालवण्याचा निर्णय

By

Published : Sep 14, 2021, 7:24 PM IST

नागपूर - रोज वाढत असलेले इंधनाचे दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सर्व सामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. हीच परिस्थिती नागपूर महानगर पालिकेचीसुध्दा झाली आहे. कर स्वरूपात मिळणारे उत्पन्न (मिळकत) आणि खर्चाची घडी बसत नसल्याने आता महानगरपालिकेने काटकसरीचा मार्ग अवलंबन्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेकडे असलेल्या सर्व गाड्यांना सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती देताना, परिवहन सभापती

पूर्ण गाड्यांना सीएनजी किट लावण्यात येणार

सुरवातीला ८३ बसेस सीएनजीवर परावर्तित केल्यानंतर आता महापौरसह सर्व विषय समितीवर नियुक्ती झालेल्या सभापतींच्या गाड्या सीएनजीवर परावर्तित करण्यास सुरुवात केली आहे. परिवहन सभापती जितेंद्र कुकडे यांनी स्वतः या संदर्भात पुढाकार घेतला आहे. त्यांना महानगरपालिकेकडून मिळालेली गाडी सीएनजीवर परावर्तित केली असून, येत्या डिसेंबर अखेरीस पूर्ण गाड्यांना सीएनजी किट लावण्यात येणार असल्याची माहिती कुकडे यांनी दिली आहे. या माध्यमातून नागपूर महानगरपालिका इंधनावर खर्च करत असलेल्या रक्कमेत ६० टक्यांची बचत होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

शहरवासीयांना बससेवा पुरवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची

गेल्या काही वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने बऱ्याच विकास कामांना ब्रेक लावण्यात आला आहे. त्यातही शहर बस सेवा आणि महानगरपालिकेच्या वाहनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. खर्चाच्या तुलनेने उत्पन्न फारच कमी असल्याने हा घाट्याचा सौदा झालेले आहे. मात्र, शहरवासीयांना बससेवा पुरवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असल्याने नागपूर मनपा कर्तव्यपूर्ती करत आहे. त्यातही आता इंधनाचा खर्च परवडत नसल्याने, परिवहन विभागाचा घाटा वाढला होता. यावर उपाय म्हणून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार शहरबस सेवेतील ८३ बसेस सीएनजीवर परावर्तित केल्या आहेत. ही योजना प्रभावी असल्याचे लक्षात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने सर्व वाहन सीएनजीवर परावर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार आणि रविवारला अनेक गाड्या या मनपाच्या आवारात उभ्या असतात. त्यावेळी त्या गाड्यांना सीएनजी किट लावण्यात येईल, अशी माहिती मनपाचे परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली आहे.

६० टक्के इंधन खर्च कमी होईल

नागपूर महानगरपालिकेकडून महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौरसह सर्व विषय समिती सभापती आणि अधिकाऱ्यांना वाहनसेवा पुरवली जाते. इंधनावर दर महिन्याला ८० लाखांचा खर्च केला जातो. मात्र, आता सर्व वाहने सीएनजीवर परावर्तित करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने, येत्या काही महिन्यात इंधनावर सध्या होत असलेल्या खर्चात ६० टक्यांची बचत होईल असा दावा परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे. शिवाय एक लिटर पेट्रोलचे दर १०८ रुपये प्रति लिटर झाले आहेत. तर, सीएनजीचे दर प्रति किलो ७४ ते ७६ रुपये इतके आहे. पेट्रोल/ डिझेलवर धावणारी कार ८ ते १२ चा मायलेज देते. मात्र, तीच कर आता सीएनजी वर २२ ते २४ चा मायलेज देत आहे. त्यामुळे यातुनही पैशाची बचत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गडकरींनी मारला फेरफटका

गेल्या १५ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. स्थानिक राजकारणावर त्यांची पकड आहे. त्याच बरोबर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी त्यांचा शब्द हा महत्वाचा मानला जातो. महानगरपालिचे इंधनावर होत असलेला खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनपाच्या बसेससह सर्व वाहनं सीएनजीवर परावर्तित करण्याची सूचना केली. त्यानुसार परिवहन सभापती कुकडे यांनी आपल्या गाडीत सीएनजी किट बसवून घेतली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या गाडीतून शहराचा फेरफटका मारला.

ABOUT THE AUTHOR

...view details