महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उपराजधानीत सक्रिय रुग्णसंख्या घटून 10 हजारच्या आत - Nagpur Corona Update

नागपूर शहरात आजच्या घडीला 339 कोरोना रुग्ण आढळूले असून, ग्रामीण भागामध्ये 341 रुग्ण आढळून आले आहेत. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 9 हजार 763 वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसत आहे.

नागपूर कोरोना अपडेट
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : May 27, 2021, 8:05 AM IST

नागपूर- नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली आहे. पण अजूनही ग्रामीण भागात रुग्णसंख्या शहराच्या तुलनेत काही प्रमाणत जास्त झालेली आहे. यात पोस्ट कोविड नंतर आता म्युकर मायकोसिसची भीती निर्माण झाली आहे. नागपूर शहरात आजच्या घडीला 339 कोरोना रुग्ण असून, ग्रामीण भागामध्ये 341 रुग्ण आढळून आले आहेत. यात एप्रिल महिन्यात पाच हाजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते.

कोरोना आकडेवारी

नागपूर जिल्ह्यात बुधवारी 16 हजार 849 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 685 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 339 तर ग्रामीण भागातील 341 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 16 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरी भागात 4, ग्रामीण भागात 7 तर जिल्हाबाहेरील 5 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. 1754 जणांपैकी शहरात 704 तर ग्रामीण 1050 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 9 हजार 763 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 72 हजार 696 जण कोरोनाबाधित झाले आहे. यातून 4 लाख 54 हजार 95 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8838 वर जाऊन पोहचला आहे.

पूर्व विदर्भात 1595 बाधित, 40 जणांचा मृत्यू

पूर्व विदर्भात 3 हजार 412 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 1 हजार 595 जण नव्याने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 40 जण हे कोरोनामुळे दगावले आहेत. यात बाधितांच्या तुलेनेत 1 हजार 817 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. तर नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 4.1 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 5.70 टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा -LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ABOUT THE AUTHOR

...view details