महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संरक्षणात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता - राज्यपाल - विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता

कधीकाळी अध्यात्मिक कौशल्याचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाला सुरुवात करणे गरजेचे असून नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल टाकल्याचा मला आनंद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

Governor Bhagat Singh Koshyari
नागपूर विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम

By

Published : Sep 15, 2021, 10:33 PM IST

नागपूर -संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपूर विद्यापीठात रक्षा आणि अंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. कधीकाळी अध्यात्मिक कौशल्याचे प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मिती व आधुनिक तंत्रज्ञानाची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाला सुरुवात करणे गरजेचे असून नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल टाकल्याचा मला आनंद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

नागपूर विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम

आशियाई देशांमध्ये इतरांचे अस्तित्व नष्ट करून केवळ आपलेच अस्तित्व जगमान्य व्हावे इथंपर्यंत कडवी संरक्षण विषयक स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे संरक्षण, आंतरिक कौशल्य या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भविष्यात गुंतवणूक होणाऱ्या नागपूर सारख्या शहरात यासाठी अभ्यासक्रम सुरू होतो, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ग्रुप कॅप्टन ग्रुप कमांडर एनसीसी एम. कलीम उपस्थित होते.

हे ही वाचा -OBC Reservation : अध्यादेश काढण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण - चंद्रशेखर बावनकुळे



विद्यापीठाला निधीची कमी पडू देणार नाही -

नागपूर विद्यापीठातील या अभ्यासक्रमाने मनुष्यबळ निर्मितीला वाव मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या परिसरात पुढील काळात संरक्षण विषयक निर्मिती क्षेत्रात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. कौशल्ययुक्त मनुष्यबळा सोबतच संरक्षण तज्ज्ञही विद्यापीठात घडावे, अभियंते, तंत्रज्ञ, अभ्यासकही निर्माण व्हावे, प्रधानमंत्र्यांनी देखील हीच अपेक्षा व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले. विद्यापीठाला निधीची कमी पडू देणार नाही. यासाठी गरज पडल्यास देश-विदेशातून निधी उभारल्या जाऊ शकतो. मात्र देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे हे अतिशय आवश्यक असून त्यादृष्टीनेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जात आहे. एकूण 11 नवे अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठ सुरू करीत आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नागपूर विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम

हे ही वाचा -ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती

नव्याने सुरू होणारा अभ्यासक्रम -

नव्याने सुरू होणारा अभ्यासक्रम कौशल्य विकासावर आधारित आहे. आयटीआय, पदविका, पदवीधारक यांच्यासोबतच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असल्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हे एकूण 11 अभ्यासक्रम (कोर्सेस) आहे. या अभ्यासक्रमांमुळे विविध आयुध निर्माण क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रक्षा व अंतरिक्ष तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्र व पदविका असे या 11 अभ्यासक्रमाचे स्वरूप असेल. विद्यापीठाचे संचालक, विद्यार्थी कल्‍याण यांच्याकडे या अभ्यासक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनात अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details