नागपूर- शहरासह परिसरात कडाक्याचे उन तापत आहे. नागपुरात उन्हाचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे. जीवाची लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेमुळे दोन वृद्धांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
नागपुरचा पारा वाढला; तापमान 45 अंशांवर, दोन वृद्धांचा उष्माघाताने मृत्यू ? - पारा
नागपुरात उन्हाचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे. जीवाची लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेमुळे दोन वृद्धांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. शहरासह परिसरात कडाक्याचे उन तापत आहे.
शहरातील पाचपावली आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वृद्धांचा मृत्यू झाला. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत 65 वर्षीय ज्ञानेश्वर वरधने हे बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळले होते. पोलिसांनी त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ज्ञानेश्वर वरधने यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
अद्याप शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. मात्र कुणीही वाली नसलेल्या वृद्धाचा मृत्यू हिटस्ट्रोकमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गतदेखील एका वृद्धाचा मृत्यू झाला. तो देखील उष्मघातांचा बळी असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.