महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कोरोना'मुळे शाळा बंद... मग शिक्षकांच्या कामाचे काय? संभ्रम कायम

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने ८ दिवसापूर्वी महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्र शासनाने यावर प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून शाळा महाविद्यालये हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढला आहे.

school closed due to corona
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंदचे आदेश

By

Published : Mar 16, 2020, 6:16 PM IST

नागपूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता यावा, यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी काय करावे, याबाबत संभ्रम कायम आहे. अशा वेळी काही संस्था शिक्षकांना जाणिवपूर्वक पुर्णवेळ शाळेत थांबवून ठेवत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूरचे कार्यवाह योगेश बन यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूरचे कार्यवाह योगेश बन यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...कोरोना: आजपासून शाळा, कॉलेज बंद, रविवारी आदेश निघाल्याने विद्यार्थी पोहोचले शाळेत

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, याची दक्षता घेण्यासाठी राज्य सरकारने शहरी भागातील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुटी घोषित केली आहे. सर्व शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे या आदेशात म्हटले आहे. शाळा बंदचा आदेश असला तरी शाळेत शिक्षकांना बोलवायचे की नाही, अशी संभ्रमाची स्थिती असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे. शाळा बंदचा आदेश केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे की शिक्षकांसाठी, याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने द्यावे. विद्यार्थांना सुटी असूनही काही शिक्षण संस्थाचालक शाळेत शिक्षकांना बोलावून ठेवत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. त्यामुळे शाळा बंदचा निर्णय केवळ विद्यार्थांसाठी आहे की, शिक्षकांनाही लागू आहे. याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details