नागपूर - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व कायदा घटनेला धरून नसल्याचे वक्तव्य केले होते. यामुद्द्यावर विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. चव्हाणांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते सभागृहाच्या कमकाजातून काढून टाका, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
नागरिकत्व विधेयकावरुन विधानसभेत पुन्हा गदारोळ; सुधीर मुनगंटीवार आक्रमक - nagpur winter assembly session 2019
सध्या नागरिकत्व विधेयकावरुन दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व विधेयकाबद्दल केलेले वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सध्या नागरिकत्व विधेयकावरुन दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याबद्दल स्पष्टता नसल्याचे सांगितले आहे. ऊस तोडण्यासाठी शेतात जाणाऱ्या वंजारी समाजाला नागरिकत्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
याबद्दल पुढे बोलताना, वंजारी समाजातील स्त्रियांचे अनेकदा शेतातच बाळंतपण होते; अशा वेळी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसतात. यानंतर ऊस कामगारांनी नागरिकत्व सिद्ध करणारे दाखले कुठून आणायचे, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच या विधेयकामुळे गरीब-श्रीमंत भेद वाढणार असल्याची टीका त्यांनी केली आहे.