नागपूर -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचा 109वा दीक्षांत ( Nagpur University Convocation ) समारोह उद्या (बुधवारी) आयोजित करण्यात आला आहे. बीए, एलएलबीची विद्यार्थीनी अपराजित गुप्ताने 8 सुवर्ण पदकांसह दोन ( Gold Medalist Student In Nagpur University ) पारितोषिके पटकावत पदक तालिकेत पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. तर जी.एस रायसोनी येथून एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी आरजु बेग या विद्यार्थ्यांनीने 7 गोल्ड मेडल प्राप्त मेडल प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. महत्वाचे म्हणजे सर्वाधिक मेडल मिळवण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत पहिल्या चार विद्यार्थीनी आहेत हे विशेष.
अपराजीता गुप्ता -ही विद्यार्थीनी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा शहराची निवासी आहे. शिक्षणासाठी ती नागपूरला आली होती. अपराजीताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉमधून बीए एएलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण सुरू करताना कधीही गोल सेट केला नव्हता. मात्र, फोकस राहून अभ्यास करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेचं एवढं मोठं यश संपादन करता आलं असं ती सांगते. केवळ कायद्याचा अभ्यास करून चालणार नाही तर कायद्यातील बारकावे, एखादा कायदा कश्यासाठी तयार झाला, त्याचा उपयोग किती आणि कसा होतो आहे, हे देखील समजून घेणं गरजेचं आल्याची जाणीव ठेवून अभ्यास केला त्यामुळे आज कायद्याच्या अभ्यासक्रमात तब्बल 8 गोल्ड मेडल आणि 2 पारितोषिक तिला प्राप्त झाली आहेत. कधीही दिवसभर अभ्यास केला नाही. मात्र, वर्षभर दिवसातील किमान 1 तास तरी अभ्यास केला असल्याचं अपराजीता सांगते. या दरम्यान अपराजीता ही सोशल मीडियावर सक्रिय होती. मोज मज्जा करत पाच वर्षातील 10 सेमिस्टरमध्ये तिने टॉप केलं आहे. केवळ फेकस राहून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्राध्यापक तर शिकवतात. मात्र, सेल्फ स्टडी केल्याशिवाय एवढं मोठं यश मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नसल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे. अपराजीता प्रोफेसर व्हायचं आहे. सोबतचं रिसर्च करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.