नागपूर- लॉकडाऊनआधी वसतिगृहात ठेवलेल्या कागदपत्रांसाठी विद्यार्थी थेट विलगीकरण केंद्रात गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजच्या वसतिगृहात घडला. या वसतिगृहाचे रुपांतरण विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे.
नागपुरात शैक्षणिक कागदपत्रे आणण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचा विलगीकरण केंद्रात प्रवेश - नागपूर लॉ कॉलेज
नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजच्या वसतिगृहात कागदपत्रांसाठी दोन विद्यार्थी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनपूर्वी हे वसतिगृह खाली करण्यात आले असून त्याचा विलगीकरण केंद्र म्हणून वापर केला जात आहे.
लॉकडाऊनपूर्वी हे वसतिगृह रिकामे करून विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणले जात आहे. या विद्यार्थ्यांचे सर्व साहित्य एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी कागदपत्रे पाहिजे असल्याचे सांगत वसतिगृहात जाण्याची महापालिका आणि विद्यापीठाकडे रीतसर परवानगी मागितली.
महापालिकेने या दोघांनाही पीपीई किट घालून जाण्याची परवानगी दिली. मात्र, यापैकी एका विद्यार्थ्याने पीपीई किट न घालताच विलगीकरण केंद्रात प्रवेश केला, तर एका विद्यार्थ्याच्या तोंडाला फक्त रुमाल बांधलेला होता. या प्रकारामुळे वसतिगृहातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.