नागपूर - मध्यप्रदेशातील पांढुर्णामधून महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात जाणाऱ्या दारूच्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात कोपरना या ठिकाणी जात असलेल्या देशी दारूची मोठी खेप पकडण्यात यश आले आहे. यामुळे एकीकडे लॉकडाऊनमुळे राज्याची सीमा बंदी असतांना महाराष्ट्रात दारू आणली जात आहे.
नागपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना देशी दारूचा मोठा साठा पकडण्यात आला. या पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये देशी दारूचे 1000 बॉक्सेस होते. यात प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारूच्या 45 बॉटल्स म्हणजेच एकूण 45 हजार बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात पांढुर्णा नागपूर मार्गावर गोपनीय माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावून मध्यप्रदेश राज्यात निर्मित दारू तिथेच विक्रीला परवानगी आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना देशी दारूचा मोठा साठा पकडण्यात आला. या पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये देशी दारूचे 1000 बॉक्सेस होते. यात प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारूच्या 45 बॉटल्स म्हणजेच एकूण 45 हजार बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. यात दारुसह ट्रक जप्त करण्यात आला असून एकूण 39 लाखांच्या मुद्देमालाच्या जप्तीची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.
हेही वाचा -दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची राजापूरमध्ये मोठी कारवाई