महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिंगणा बायपासवरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसची कंटेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी - Hingna Bypass

मोहगाव वरुन हिंगण्याच्या दिशेने जानाऱ्या बाजारगाव-नागपूर एसटी बसने (क्र एम एच ०७ सी ७१३८)  अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र एन एल ०१ क्यू ९६४८ ) हिंगणा बायपास चौरस्त्यावर समोरून धडक  दिली. या अपघातात बस चालकाची केबिन चकणाचूर झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिंगणा बायपास वरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसची कंटेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी

By

Published : Jul 13, 2019, 7:49 PM IST

नागपूर -हिंगणा बायपासवरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकासह २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

हिंगणा बायपास वरील मोहगाव चौरस्त्यावर एसटी बसची कंटेनरला धडक, चालकासह २३ प्रवासी जखमी

मोहगाववरुन हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजारगाव-नागपूर एसटी बसने (क्र.एम एच ०७ सी ७१३८) अमरावतीकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र एन एल ०१ क्यू ९६४८ ) हिंगणा बायपास चौरस्त्यावर समोरुन धडक दिली. या अपघातात बस चालकाची केबिन चकणाचूर झाली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एसटी बस चालक नरेश लहानुजी बोण्डाळे यांच्यासह इतर ५ गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आले. किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार करुन सोडण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details