महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) हे आज नागपूरमध्ये पक्षाच्या मेळावासाठी आले असताना, माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी नवीन सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव बदलण्यासह एकूण पाच निर्णय घेतले होते. हे निर्णय जर हे निर्णय सरकार मागे घेत असेल, ते हे हिंदुत्व द्रोही, ( This Government is hypocrite ) महाराष्ट्र द्रोही ( BJP is Anti Hindutva in Maharashtra ) आहेत. या निर्णयाला स्थगिती देणारे शिंदे आणि फडणवीस हे ढोंगी सरकार आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत

By

Published : Jul 15, 2022, 12:29 PM IST

Updated : Jul 15, 2022, 1:28 PM IST

नागपूर : आज नागपूरमध्ये शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव बदलण्यासह एकूण पाच निर्णय घेतले होते. हे निर्णय जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former CM Uddhav Thackeray ) यांनी घेतला असला तरी ही भाजपची अनेक वर्षांपासून मोर्चे काढून नाव देण्याची मागणी होती. आता जर हे निर्णय सरकार मागे घेत असेल, ते हे हिंदुत्व द्रोही ( BJP is Anti Hindutva in Maharashtra. ), महाराष्ट्र द्रोही आहेत. या निर्णयाला स्थगिती देणारे शिंदे आणि फडणवीस हे ढोंगी सरकार आहे. मुळात हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने निर्माण झाल्याने यांना हा निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही. ( This Government is hypocrite )


निर्णय स्थगितीचा जाब विचारला पाहिजे :उद्धव ठाकरेंनी केलेले नामांतरणाला स्थगिती का दिली? याचा जाब हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे. कारण मुख्यमंत्री यांच्या हातात काहीच नाही. देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत. शिंदे यांना कोणते अधिकार नाहीत. सगळे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत.

औरंगाबाद नामकरण रद्द : लोकांच्या भावना होत्या म्हणून उद्धव ठाकरे सरकारने निर्णय घेतले होता. आर्थिक निर्णय समजू शकतो बुलेट ट्रेन विषयी निर्णय समजू शकतो. पण, औरंगाबादचे संभाजीनगर नामांकनाचा निर्णय मागे घेतला. औरंगजेब केव्हापासून नातेवाईक झाला? असा प्रश्न उपस्थित केला. उस्मान कोण लागतात, कोर्टची टांगती तलवार सरकारवर असल्याने डोकं बधिर झाले आहे, त्यामुळे स्थगिती देत आहेत.


मी निष्ठावान शिवसैनिक : नक्कीच पवार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न असेल, वेळ जडली तर भेटू, ठरवून एकाच हॉटेलमध्ये आम्ही थांबलो, असे म्हणू शकता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असेल, असे म्हणायला मी काय मालक आहे. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. कोणी आरोप करीत असेल तर व्याख्या बदलाव्या लागतील. नवीन डिक्शनरी आणली असेल, भष्ट्र, ढोंगी गद्दार हे शब्द वापरायचे नाही, असे म्हटले. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भाजपने आपल्या सोबत नेलेले आहे, त्यांना लखलाभ त्यांचे लखलाभ असूदे....

संसद निर्णय : संसदेमध्ये यापुढे काहीच बोलता येणार नाही, तोंड हात-पाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या लावून जावे लागेल ही आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. फडणवीस चिठ्ठी...कधी चिठ्ठ्या पाठवतात कधी माईक ओढतात, कधी शर्ट खेचतात, बराच गमती महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहेत. तेवढे मी यावर काय बोलणार? खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत.

राज्यपाल :सामनातून राज्यपालांवर केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सध्या घटनाबाह्य गोष्टी करीत असताना राज्यपाल काय करीत आहेत. राज्यपालांनी घटनेचे सर्व नियम पायदळी तुडवून हे सरकार स्थापन होण्यास सहकार्य केले. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना विधान सभा अध्यक्षाची निवड होणे. बहुमत चाचणी होणे हे सर्व घटना नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे घटनेचे चौकीदार असलेले राज्यपाल यांनी घटना समुद्रात बुडवली आहे, असे म्हणावे लागेल.

हेही वाचा : Unique Marriage in Heavy Rain : नवरदेवाची पुरात कसरत... थर्माकोलच्या मदतीने 7 कि.मी. नदीमार्गाने जलप्रवास... अखेर पोहोचला नवरीकडे!

हेही वाचा : Padgigudam Irrigation Project Video : ओव्हरफ्लो पकडीगुडम धरणावर हौशी मासेमारांची गर्दी; संकटातही संधी

हेही वाचा : Shinde government : शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी धक्का; नामांतराच्या निर्णयाला दिली स्थगिती

Last Updated : Jul 15, 2022, 1:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details