नागपूर- शहरात जानेवारी 2020 ते मार्च 2021 या कोरोना माहामारीची काळात टाळेबंदी आणि संकटातून जात होते. या काळात जवळपास साडे सहा लाख गरजूंची भूक भागवण्याचे काम शिवभोजन थाळी उपक्रमातून झाले आहे. प्रत्येक केंद्रावरून दिडशेपेक्षा जास्त जण हे लाभ घेत असल्याने उपाशी राहण्याची वेळ या थाळीमुळे टळली. गेल्या आठवड्याभरापूर्वी 10 केंद्र असताना आणखी 5 केंद्राची भर पडली आहे.
नागपूर शहरातील पूर्वीच्या आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या पाच नवीन केंद्र सुरू झाल्याने शहरात 15 शिवभोजन केंद्रावरून टाळेबंदीच्या काळात निराश्रित, निराधार नागरिकांना मोफत शिवथाळीचे वितरण सुरू आहे. दररोज दीड हजार लोकांना अशा पद्धतीने वर्षभरात 6 लाख 48 हजार वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पहिल्या लाटेत टाळेबंदी आणि दुसऱ्या लाटेत ‘कडक निर्बंध’ लागल्याने घराबाहेर पडणे बंद झाले. उपराजधानी अनेक दिवस कोरोनाचा हॉटस्पॉट असताना कुठेतरी निवारा शोधून आयुष्य काढणे, अशी ज्या निराश्रितांची परिस्थिती त्यांना या भोजन थाळीची मदत झाली. शंभर वर्षात अशा पद्धतीची भयानक वेळ मानवी समुदायांवर पहिल्यांदाच आली. अनेक दिव्यांगाना बोलणेही येत नाही. त्या गरजुंना या केंद्राचा आधार झाला आणि उपासमार टळली.