महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरातील रुग्णालयात ऑक्सिजन व्यवस्था कशी आहे? - ऑक्सिजन सिलेंडर नागपूर

नागपूरचे सर्वाधिक मोठे कोविड हॉस्पिटल म्हणून शासकीय रुग्णलयाचा आहे. आताच्या घडीला 900 कोविड बेड आहे. यात कोरोनाच्या रुग्णामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण होत आहेत. यात दररोज आयनॉक्स एअरकडून लिक्विड टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा साठा केला जात आहे.

ऑक्सिजन, oxygen
ऑक्सिजन

By

Published : Apr 26, 2021, 6:54 AM IST

नागपूर - उपराजधानी नागपूरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत आहे. यात रुग्णांना ऑक्सिजनची प्रचंड मागणी वाढली आहे. या सर्व परिस्थिती कुठलीही गंभीर घटना घडून हकनाक कोणाचा बळी जाऊ नये, यासाठी उपाययोजनांची गरज आहे. यात उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची नव्याने 20 मेट्रिक टनचा ऑक्सिजन टॅंक हा कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आले आहे.

नागपूरचे सर्वाधिक मोठे कोविड हॉस्पिटल म्हणून शासकीय रुग्णलयाचा आहे. आताच्या घडीला 900 कोविड बेड आहे. यात कोरोनाच्या रुग्णामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण होत आहेत. यात दररोज आयनॉक्स एअरकडून लिक्विड टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा साठा केला जात आहे.

नागपुरातील रुग्णालयांमधील कोरोना परिस्थितीचा आमच्या प्रतिनीधींनी घेतलेला आढावा..
यात ऑक्सिजन युनिटला मेन्टेन्सची जबाबदारी खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. यासह ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा नव्याने बसविण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी एक लिक्विड लाईन, मिडफोल्ड लाईन आणि इमर्जन्सी लाईन अशा पद्धतीने पुरवठा होतो. यात एक पर्याय मध्ये तांत्रिक अडचण आल्यास दुसरा पर्याय स्वयंमचलीत यंत्रणेच्या माध्यमातून सुरू केली जाते.याठिकाणी नाशकातील रुग्णलायत जे घडले ते घडू नये, यासाठी कर्मचारी नियुक्त असून याची देखरेख केली जाते. शिवाय कुठला अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा रक्षकासह तारेच्या उंच कंपाउंडसह सायरन व्यवस्था लावण्यात आली आहे.

हेही वाचा -रेमडेसिवीरमध्ये ग्लुकोज भरून वीस हजाराला विकणारे पाच जण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details