नागपूरदोन दिवसांपूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जात असलेल्या एका कैद्याकडे गांजा आणि मोबाईलच्या १५ बॅटरी आढळल्या होत्या. या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळपासून जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
कैद्याकडे गांज्यासह मोबाईलच्या १५ बॅटरी सापडल्यानंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू
सोमवारी न्यायालयातून सुनावणी पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये जात असलेल्या एका सूरज कावडे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडे ५१ ग्रॅम गांजा आणि पंधरा मोबाईल बॅटरी सापडल्या होत्या. त्याच प्रकरणात तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आज पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन नागपूर शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सुमारे दोनशे पोलीस कर्मचारी सेंट्रल जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत.डॉग स्क्वॉडची देखील मदत घेतली जात आहे. या सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून जेलमधील सर्व पुरुष बॅरॅकमध्ये शोध मोहीम राबविली जाणार असून काही कैदी जेलच्या आतून सर्रास मोबाईल फोनचा वापर करत असल्याचे समोर आल्या नंतर पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशनसोमवारी न्यायालयातून सुनावणी पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये जात असलेल्या एका सूरज कावडे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडे ५१ ग्रॅम गांजा आणि पंधरा मोबाईल बॅटरी सापडल्या होत्या. त्याच प्रकरणात तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे आज पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.