नागपूर -मिशीन बिगीन अंतर्गत महापालिका क्षेत्रात शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी अखेर सोमवारपासून खुले झालेत. दीर्घ कालावधीपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिकवणी सुरू होती. नागपूर महानगर पालिका क्षेत्रात आजपासून ऑनलाइननतंर 29 शाळेत प्रत्यक्ष शिकवणीला सुरुवात झाली. यात शिक्षकांनी मुलांचे वेगळ्या पद्धतीने कोरोनाच्या नियमाची काळजी घेऊन स्वागत केले. यावेळी महापालिकेचे शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळेना भेट देत आढावा घेतला.
शहरातील जवळपास 29 शाळा आज (दि. 4 जाने.) विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहे. विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक शाळेत मुलांना कोरोनाच्या नियमाचे पालन करून प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मुलांचे टाळ्या वाजवत स्वागत करण्यात आले. बऱ्याच महिन्यांनी मित्रांसोबत नाही पण सामाजिक अंतर ठेवत एका बाकावर एक बसून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला सुरवात झाली.
सेवानिवृत्त होण्याअगोदर शिकवायला मिळवल्याने आनंदच
मागील काही दिवसांपासून शाळा बंद आहे. ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची वेळ शिक्षकांवर आली. कोरोनामुळे आलेले हे आव्हान पेलण्यात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यात शाळा केव्हा सुरू होणार आणि एकदाचे शिक्षकांना अडचणी विचारणार असे काहीसे मुलांना वाटत होते. तसेच काहीसे अनेक शिक्षकांना वाटत होते. शेवटच्या महिन्यात काही दिवस का होईना ही संधी मिळाल्याने आनंद गगनात मवेनासा असल्याचे होण्याऱ्या शिक्षेकेला सुद्धा वाटत होते. पण, आदेश धडकले आणि आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे शिक्षिका ज्योत्स्ना काट्यारमल यांनी ईटीव्ही भारतशी बोलून दाखवले. तेच मुलांनीही प्रत्यक्ष शिकवणीचा आनंद अधिक असल्याचे बोलून दाखवले. ऑनलाइनमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. आता थेट समोर असल्याने सोपे जाईल यासाठी आनंद असल्याचे बोलून दाखवले.
15 जानेवारीनंतर मिळणार 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना टॅब