महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'उद्या दूध दरवाढ विषयावर नियोजित बैठक म्हणून भाजपाने आजच आंदोलन उरकले'

भाजपासह घटक पक्षातर्फे दूध दरवाढ संदर्भात राज्यात आंदोलन सुरू आहे. तर, दूध दरवाढी संदर्भात उद्या (मंगळवार दि.21 जुलै) रोजी मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

Sunil Kedar
सुनील केदार

By

Published : Jul 20, 2020, 8:12 PM IST

नागपूर - राज्यात भाजपासह घटक पक्षातर्फे दूध दरवाढ संदर्भात आंदोलन सुरू आहे. तर, दूध दरवाढी संदर्भात उद्या (मंगळवार दि.21 जुलै) रोजी मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. उद्याची बैठक नियोजितच होती. मात्र, भाजपने आपले 1 ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन हे उद्याचा बैठकीला बघून आजच केले. परंतु, भाजपाच्या आंदोलनाला आपल्या शुभेच्छा असल्याची उपरोधिक टीकाही केदार यांनी केली.

राज्याचे पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा -'ते' हिंदूंचा अपमान करत असताना हिंदूहृदयसम्राटांचे वारसदार मूग गिळून गप्प का?

महाराष्ट्रात दुधाची मागणी कमी पडू नये आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. ज्यामध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ज्यादा दराने दूध घेऊन त्यापासून भुकटी तयार करणार होते. यामध्ये केंद्र आणि राज्य 50-50 टक्के, असा खर्चाचा भाग सहन करणार होते. मात्र, केंद्र सरकारने राज्य सरकारची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले असून या संदर्भात काम सुरू आहे. परंतु, दुधाला भाव मिळाले पाहिजे, अशी सरकारची भावना असून उद्याचा बैठकीत यावर चर्चा केली जाईल. सर्वांची मते घेऊन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णय घेऊ, असेही पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details