महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एका एकी- सरसंघचालक मोहन भागवत - शोकसंदेश

संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानंतर प्रत्येकजण त्यांच्या कतृत्ववान आठवणींना उजाळा देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील शिवशंकर भाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक फोटो शेअर केला आहे. शिवशंकर भाऊ पाटील आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली होती तेव्हाचा तो फोटो आहे.

सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत

By

Published : Aug 5, 2021, 3:49 PM IST

Updated : Aug 5, 2021, 5:13 PM IST

नागपूर - संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानंतर प्रत्येकजण त्यांच्या कतृत्ववान आठवणींना उजाळा देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील शिवशंकर भाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक फोटो शेअर केला आहे. शिवशंकर भाऊ पाटील आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली होती तेव्हाचा तो फोटो आहे. तसेच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांचा शोकसंदेशात -
शिवशंकर भाऊ पाटील यांच्या देहावसानाची वार्ता ऐकून या ओळी मनात आल्या. पराकोटीची निस्पृहता आणि मनामध्ये कणव बाळगून श्री. शिवशंकर भाऊंनी प्रपंचाची वाटचाल परमार्थाच्या आधारावर करून दाखविली. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात कमल पत्रावरील जल बिंदू प्रमाणे निर्लिप्त वृत्तीने अखंड सेवेचे व्रत चालविले. श्री. गुरुजी जन्मशती समितीचे सदस्य असताना त्यांच्या संत सदृश जीवनाचे दर्शन मला जवळून घेता आले. हे मी माझे व्यक्तिगत सौभाग्य मानतो. एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी सुरु केलेल्या पुढच्या प्रवासात शांती व प्रकाशाचा अधिकार त्यांनी मिळवलेलाच आहे. त्यांच्या सारखेच निरलस वृत्तीने भक्ती व सेवेचे व्रत अखंड सुरु ठेवण्याचे दायित्व आपणा सर्वांवर आले आहे. ते उत्तम रीतीने पार पाडण्याचे धैर्य व शक्ती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना श्री परमेश्वर चरणी करीत मी श्री शिवशंकर भाऊंच्या पवित्र स्मृतीला माझी व्यक्तिगत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.

संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एका एकी- सरसंघचालक मोहन भागवत

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दु:ख व्यक्त -

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मी शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा -भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन

Last Updated : Aug 5, 2021, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details