नागपूर - मतदान करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अथक प्रयत्नानंतरही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता निवडणूक आयोगाबरोबर अनेक सामाजिक संघटना आणि संस्था जनजागृती मोहिम राबवतात. याच प्रयत्नांना हातभार लागावा या उद्देशाने नागपुरातील तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० टक्के सूट देणार असल्याची योजना सुरू केली आहे.
मतदान करा अन् तर्री पोहा व आलू बोंड्यावर ५० टक्के सूट मिळवा.. - नागपूर
नागपुरातील तर्री पोहे विकणाऱ्या काकांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० टक्के सूट देणार असल्याची योजना सुरू केली आहे.
गणेश फुकमारे यांचे पोहा विक्रिचा स्टॉल
गणेश फुकमारे असे तर्री पोहा विकणाऱ्या काकांचे नाव आहे. लोकशाही मजबूत करायचे असेल तर प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरजेचे आहे. आपण मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बिलातील ५० टक्के रक्कम माफ करणार असल्याचे गणेश फुकमारे यांनी सांगितले. गणेश काका रोज ३०० प्लेट्स तर्री पोहा विकतात. मात्र, मतदानाच्या दिवशी सुमारे ७०० ते १००० प्लेट्स तर्री पोहा आणि आलू बोंडेची विक्री होईल, असा अंदाज काकांनी व्यक्त केला.