महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंगणवाडी, बालवाडीच्या वर्गावर आता सरकारचे नियंत्रण; ईसीसीई योजनेची घोषणा - Education

बालकांना अंगणवाडी आणि बालवाडीत शिक्षणासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने ईसीसीई योजनेची घोषणा केली.

अंगणवाडी

By

Published : Mar 25, 2019, 1:22 PM IST

नागपूर - महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून 'अर्लीअर चाईल्ड केयर अँण्ड एज्युकेशन' (ईसीसीई) योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेनुसार बालकांचे संगोपन, शिक्षणासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यकारी समिती तयार करुन पूर्व शिक्षणाचा आराखडा आखण्यात येत आहे.

माहिती देताना आरटीई कार्यकर्ते शहीद शरीफ


६ वर्षांखालील सर्व बालकांना, शासकीय, निमशासकीय आणि खासगी अंगणवाडी आणि बालवाडीमध्ये शिक्षण द्यावे लागेल. १ ते ६ वर्षापर्यंतच्या बालकांची शैक्षणिक माहिती महिला विकास बाल कल्याणच्या सीएसआर पोर्टलवर भरायची आहे. या अंतर्गत येणाऱ्या शाळांची शहानिशा आणि नियंत्रणाची जवाबदारी मनपा, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेवर आहे.


शासन निर्णयानुसार १-६ वर्षे वयोगटातील बालकांचे शैक्षणिक शुल्क घेण्याचे अधिकार शाळांना राहतील. तसेच मुलांची प्रवेश परीक्षा आणि पालनाची चाचणी घेण्याचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण होऊ नये, ६ वर्षां खालील बालकांची परीक्षा घेता येत नाही, असे आरटीई २००९ च्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, महिला व बाल कल्याण विभागाने अर्लीअर चाईल्ड केयर अँड एज्युकेशन (ईसीसीई) च्या योजनेमुळे आरटीईचे सर्व नियम मोडीत काढल्याचे मत आरटीई कार्यकर्ते शहीद शरीफ यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details