महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सभागृहात सूचना प्रस्ताव नियम 289 चा गैरवापर होतोय, सभापती निंबाळकरांनी बोलावली बैठक

सभागृहात अनेक सभासद सर्वसाधारण विषयांच्याबाबत देखील सातत्याने नियम 289 चा वापर करतात. त्यामुळे महत्वाचे विषय बाजूला राहतात, असे विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी म्हटले आहे.

Chairman RamRaje Naik-Nimbalkar
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

By

Published : Dec 19, 2019, 3:12 PM IST

नागपूर - शहरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशना दरम्यान सभागृहात अनेक विषयांवर चर्चा होणे अपेक्षीत असते. मात्र काही सभासद सूचना प्रस्ताव नियम क्रमांक 289 चा वापर सातत्याने करतात. त्यामुळे अनेकदा चर्चा लांबत जाते. हा गैरवापर टाळण्यासाठी गटनेत्यांची बैठक बोलावून नियम समजून घ्या, अशी सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दिली आहे.

हेही वाचा... 'हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार'

ज्या नियमाचा अर्थ समजला नाही त्याला हत्यार करून ठेवले

सभागृहात एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु असल्यास आपला विषय त्यात मांडण्यासाठी नियम 289 चा वापर केला जातो. मात्र या नियमाचा वापर क्वचित करावा, असे अपेक्षित आहे. तरीही अनेक सभासद त्याचा सातत्याने वापर करतात. त्यामुळे ज्या नियमाचा अर्थ समजला नाही त्याला हत्यार करून ठेवले आहे. असे दिसत असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी म्हटले आहे. सभागृहासाठी 57 कायदे आहे. त्यात प्रामुख्याने नियम 289 चा गैरवापर होत आहे. यामुळे उद्या शुक्रवारी 11 वाजता बैठक होणार आहे, असे सभापतींनी म्हटले आहे.

हेही वाचा... #CAA विरोधी आंदोलन : उत्तर प्रदेश, बंगळुरु अन् लाल किल्ला परिसरात कलम १४४ लागू

हेही वाचा... राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर - प्रविण दरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details