नागपूर -गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती विदर्भात कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाचे व्यक्त केला आहे. विदर्भातील काही भागात पावसा सोबतच गारा देखील पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम एल साहू यांनी व्यक्त केली आहे
हेही वाचा -केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य; ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस
गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरातुन थंड वारे वाहत असल्याने वातावरणात बदल झाला. त्यामुळेच माध्यभारतात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली होती. सामान्य पेक्षा पाच अंश सेल्सिअस पेक्षा तापमान वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवायला लागला होता,मात्र अचानक वातावरणात बदल झाल्याने आता किमान तापमान ३० अंशावर आलेलं आहे. दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम एल साहू यांनी दिली आहे.