नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभेत बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी राहुल गांधीनी अनेक आश्वासनांची यादी सादर केली. गरिबी हटवण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याचेही त्यांनी येथे जाहीर केले. त्यामुळे राहुल गांधींच्या सभेनंतर नागपुरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उसळला आहे.
राहुल गांधींच्या सभेनंतर नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह - Pm Narendra Modi
राहुल गांधी यांनी जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी राहुल गांधीनी अनेक आश्वासनांची यादी सादर केली.
कार्यकर्ते
महिलांच्या खात्यात थेट ७२ हजार रुपये जमा करणे, महागाई भ्रष्टाचारासह राफेल आणि उद्योगपतींना सुरू असलेली मदत या प्रमुख मुद्यांवर राहुल गांधी यांनी सडकून टीका केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.