नागपूर - मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. नागपुरातील सक्करधरा परिसरातील एका फ्लॅटमध्ये देहव्यापार सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सक्करधरा पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
तीन दलालांना अटक-
शहरातील प्रतिष्ठित भाग असलेल्या सक्करधरा परिसरात मसाज सेंटरच्या आड देहव्यापार सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून हे रॅकेट सुरू होते. मसाज सेंटर असल्याने याकडे कोणीही फारसे लक्ष देत नव्हते. मात्र पोलीस सूत्राच्या माध्यमातून ही माहीती पोलिसांना कळताच मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी तीन दलालांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.