नागपूर -गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या कारवाई दरम्यान जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. एकूण 57 गुन्ह्यात जप्त गांजा,ड्रग्स सह 411 किलोचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत,त्याची बाजारात किंमत 1कोटी 75 लाख रुपये इतकी आहे.
57 गुन्हात जप्त 411 किलोचे अमली पदार्थ पोलिसांनी केले नष्ट
मागील काही काळात नागपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापैकी 57 गुन्ह्यात पकडण्यात आलेले 411 किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 1 कोटी 75 लाख रुपये पेक्षा जास्त आहे. अमली पदार्थ केव्हा आणि कसे नष्ट करावे हे निश्चित पोलिसांची एक समिती आहे. या समितीमध्ये पोलीस विभागातील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. त्यांच्या मार्गदर्शनचं जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नष्ट केले जातात.
गेल्या काही काळापासून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा आणि एम.डी ड्रग्स तस्करांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. मधल्या काळात शहरात मोठ्याप्रमाणात गांजा आणि ड्रग्स पोलिसांच्या मालखाण्यात जमा झाला होता. जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ साठवून जास्त दिवस सुरक्षित ठेवणे कठीण असते त्यामुळे ते अमली पदार्थ वेळोवेळी नष्ट करावे लागतात.
411 किलो मुद्देमाल नष्ट -मागील काही काळात नागपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापैकी 57 गुन्ह्यात पकडण्यात आलेले 411 किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 1 कोटी 75 लाख रुपये पेक्षा जास्त आहे.
समितीच्या शिफारशी नंतर मुद्देमाल नष्ट केला जातो -अमली पदार्थ केव्हा आणि कसे नष्ट करावे हे निश्चित पोलिसांची एक समिती आहे. या समितीमध्ये पोलीस विभागातील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. त्यांच्या मार्गदर्शनचं जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नष्ट केले जातात.