महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर : पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; चौघांचा शोध सुरू - गोल्डीची हत्या

शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची दिवसाढवळ्या चाकूने वार करून हत्या झाली आहे. गोल्डी शंभरकर (वय 24 वर्षे), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमानस्यातून गोल्डीची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : Oct 21, 2021, 4:50 PM IST

नागपूर -शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची दिवसाढवळ्या चाकूने वार करून हत्या झाली आहे. गोल्डी शंभरकर (वय 24 वर्षे), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमानस्यातून गोल्डीची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. शारीक खान, जहांगीर खान, फैय्याज आणि निहाज, असे आरोपींची नावे आहेत.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज (दि. 21) सकाळी गोल्डी शंभरकर आणि त्याच्या चार मित्रांमध्ये जुन्या वादाच्या विषयांवरून भांडण सुरू झाले. अचानक त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी गोल्डीवर चाकूने हल्ला चढवला. गोल्डीला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यंत गोल्डीचा मृत्यू झाला होता.

मृत व आरोपी हे दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे

या प्रकरणातील मृत गोल्डी शंभरकर आणि चारही आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल आहेत. मात्र, गोल्डीची हत्या करण्यामागे नेमका कोणता वाद आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा -भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, आठवडाभरा अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details