नागपूर -नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन ( Jaripatka Police Station News ) अंतर्गत एका महिलेने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एकाकडून 2 लाखाची खंडणी वसूल ( Woman arrested for demanding ransom in Nagpur ) केली. पहिले प्रेम मग शारीरिक संबंध आणि त्यानंतर बलात्काराच्या नावावर खंडणी वसुलीचा गोरखधंदा चालवणाऱ्या एका महिलेला जरीपटका पोलिसांनी तिच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. मेघाली उर्फ भाविका उर्फ भावना (३५) आणि मयूर मोटघरे (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असून दोघांनी अश्या पद्धतीने अनेकदा तक्रारीकरून खंडणी वसूल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल्याने त्यांना जरीपटका पोलीसांनी अटक केली आहे.
जवळीक साधून केली लग्नाची मागणी -या प्रकरणात नागपूर शहराच्या जरीपटका भागात राहणाऱ्या भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला (महेंद्र) मेघाली हिने भाजी विकत घेता घेता जवळीक साधली. त्यानंतर हळूहळू मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध जुळले. यात पतीच्या त्रासामुळे वेगळी राहत असल्याचे सांगत तिने त्या (महेंद्र) प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. जवळीक साधत दोघात शारीरिक संबंध झाले. अचानक मेघाने १६ सप्टेंबर २०२१ रोजी महेंद्रचे घर गाठले. कुटुंबियांसमोर लग्नाची मागणी केली. लग्न न केल्यास बलात्काराच्या आरोपात अडकवेल अशी धमकी फिर्यादीला दिली. अविवाहित असल्याने त्याने (महेंद्र) लग्न करून घेतले. पण आठच दिवसात मेघालीने भांडण तंटे सुरू केले. त्यानंतर घराबाहेर पडून बाहेर वेगळे भाड्याने घर घेऊन राहायला सुरुवात केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
पतीला सापडलेले होते - याच दरम्यान मेघालीने पतीसोबत मयूर मोटघरे याची ओळख मावस भाऊ अशी करून दिली. पण एक दिवशी फिर्यादी पती अचानक घरी आला असता मेघाली आणि कथित मावस भाऊ हे दोघेही आपत्तीजनक परिस्थिती मिळून आल्याने तिचे पितळ उघडे पडले. मेघाली आणि पतीचे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. मेघालीने पतीला पैश्याची मागणी केली. यात कुटुंबीय शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी मेघालीच्या तक्रारींवरून पतीला (महेंद्रला) अटक केली. मेघालीने महेंद्र आणि कुटुंबियांविरुद्ध बलात्कार आणि छळ होत असल्याचा आरोप करत जरीपटक ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महेंद्रला अटक करून कारागृहात टाकले. यात फिर्यादी (महेंद्रनेही) या दोघांच्या विरोधात तक्रार केली. अखेर जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी चौकशी करून दोघांचा शोध घेऊन त्यांनी फसवणूक केलेल्या घटनांची माहिती घेत मेघाली आणि तिच्या साथीदाऱ्याला जेरबंद केलेत.
प्रेमाच्या हनीट्रॅपमध्ये अनेकजण अडकले (Honeytrap of love ) -या महिलेने आणि साथीदाराने वर्ध्यातील अनेकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. तिने वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, सेवाग्राम, सेलू समुद्रपूर या ठाण्यात पाच ते सातपेक्षा अधिक लोकांना बलात्कार विनयभंग अश्या खोट्या तक्रारी करून खंडणी वसूल केली आहे. जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी सर्व बाबींची माहिती घेऊन अखेर लोकांना फसवत गंडा घालणाऱ्याना बेड्या घातल्या आहेत.
हेही वाचा -Minor Girl Physical Abused : इन्स्टाग्रामवर तरुणाशी झाली अल्पवयीन तरुणीची ओळख, त्याने हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार