नागपूर - नागपूर जिल्ह्यात जिथे एप्रिल महिन्यात 80 हजारच्या घरात सक्रिय रुग्ण होते. आता त्यात घट झाली आहे. दुसऱ्या लाटेतील सक्रिय रुग्ण संख्या 2776 इतकी आहे. यातही केवळ 1071 रुग्ण हे दवाखण्यात उपचार घेत आहे. यामुळे सक्रिय रुग्णासोबत दररोज येणारे रुग्णसंख्या मागील तीन दिवसांपासून 80 च्या घरात आहे.
नागपुरात दुसऱ्या लाटेतील नवीन बाधितांचा निच्चांक नोंदवल्या गेला आहे.
नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 10 हजार 635 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 81 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरी भागात 42 तर ग्रामीण भागात 36 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच 8 जण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 5, तर ग्रामीण भागात 0, तर जिल्हाबाहेरील 3 जण दगावले आहेत. तेच 322 जणांपैकी शहरात 233 तर ग्रामीण 99 जण कोरोना मुक्त झाले आहेत. यात 1 हजार 071 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 1 हजार 605 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.
आतापर्यंतची परिस्थिती...