विशेष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दीक्षाभूमीवर 'नो एन्ट्री'
नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अतिशय भीषण झालेली असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कुणालाही दीक्षाभूमीवर प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार दीक्षाभूमीचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहे.
नागपूर -यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती घरून साजरी करावी, असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीकडून करण्यात आले आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आणि राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ज्यामुळे रुग्ण संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अतिशय भीषण झालेली असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कुणालाही दीक्षाभूमीवर प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार दीक्षाभूमीचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सुद्धा कोरोनामुळे बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमांसह अनेक आयोजन रद्द करण्यात आले होते, या वर्षी सुद्धा परिस्थिती बदललेली नसली तरी आणखी भीषण झालेली असल्याने याही वर्षी दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.