महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

National Tourism Day 2022 : जंगल बुकमधील मोगलीचे गाव बघितले? मग 'या' व्याघ्र प्रकल्पाला नक्कीच भेट द्या! - Wildlife photographer Varun Thakkar

पेंचपासून 100 किलोमीटरवर पुढे अमोदागढ हे स्थळ जंगल बुकची कहाणी किंवा कथानक याच भागातील परिस्थितीवर लिहण्यात आल्याचे बोलले जात असल्याचे व्याघ्र प्रेमी तथा वाईल्डलाईफ फोटो ग्राफर वरुण ठक्कर सांगतात. याच भागाला लॅंड ऑफ मोगली असेंही म्हंटले जाते. त्यामुळे यापूर्वी कधी प्लॅन केला नसल्यास मोगलीचे गाव पाहायला नक्की जा आणि कादंबरीकार रुडयार्ड किपलिंगचे जंगलबुक जंगल सफारीचाही आनंद घ्या...

National Tourism Day 2022
व्याघ्र प्रकल्प

By

Published : Jan 25, 2022, 9:08 AM IST

Updated : Jan 25, 2022, 4:18 PM IST

नागपूर- आज राष्ट्रीय पर्यटन दिवस ( National Tourism Day ) आहे. विदर्भातील पर्यटन म्हणाल तर वनपर्यटनला सर्वाधिक पसंती असते. कारण सर्वाधिक जंगल आणि व्याघ्र प्रकल्प हे विदर्भात आहे. यातच जंगल बुक मोगली लॅन्ड म्हणून प्रसिद्ध असलेले पेंच व्याघ्र प्रकल्प काही खासच आहे. प्रसिद्ध कादंबरीकार रुडयार्ड किपलिंग ( Novelist Rudyard Kipling ) द्वारा लिखित जंगल बुक ( Jungle Book ) याच पेंचचा भाग असलेला अमोदागढ ( Amodagarh Pench Tiger Project ) तुम्हाला मोगली आणि बालपणात घेऊन जाते. ते कसे, जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून...

जंगल बुकमधील मोगलीचे गाव बघितले?

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात विस्ताराला आहे पेंच -

जंगल सफारीसाठी पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशमध्येच नाही, तर पर्यटक किंवा वनभ्रमंती करणाऱ्यांमध्ये कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. 1975 साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले. फेब्रुवारी 1999 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला. पेंच व्याघ्र प्रकल्पात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य असून जणू निसर्गाने धर्तीवर स्वर्गच बहाल केला आहे. हिरवेगार वृक्ष, विविध प्रकारचे उंच वृक्षसंपदा, 1200 पेक्षा अधिक झाडांच्या प्रजाती येथे आढळतात. जंगलातून वाहणारी पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात ( Pench River ) विभागला गेला आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेला पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प 257 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारला आहे. ज्यामध्ये 10 टक्के भाग महाराष्ट्रात तर उर्वरित 90 टक्के भाग हा मध्यप्रदेश मध्ये येतो.

पाटदेव वाघीण आहे आकर्षण -

या व्याघ्र प्रकलातील मुख्य आकर्षण म्हणजे वाघ आहे. आतापर्यंत कॉलरवाली वाघीण आणि तिने जन्माला घातलेले वाघ हे आकर्षण ( Tiger Siting in Pench Project ) होते. कॉलरवाली वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्यापासून जन्माला आलेली पाटदेव वाघीण आणि तिचे पाच बच्चे हे पर्यटकांना आनंद देऊन जाते. यासोबतच बिबट, कोल्हा, सांबर, काळवीट, जंगली मांजर, जंगली कुत्रा, हरण, निलगायी, अस्वल, घुबड यासारखे प्राणी पहायला भेटतात. तसेच साप, गरुड, राखी डोक्याचा मत्स्य गरुड, मोहोळ, घार, हळद्या, तांबट, खंड्या असे जवळपास 225 प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. तसेच या भागातील वातावरण पाहता पानगळीचे वन म्हणून सुद्धा ओळख आहे. साग आणि बांबूचे झाडही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यातच खास वाघाला पाहण्यासाठी घनदाट जंगलात किर्रर्र असा आवाज जंगलातून जात असलेल्या पर्यटकाना साहसी अनुभव देऊन जातो. व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार, चोर बाहुली, खुबाळा या गेटवरून महाराष्ट्र्रातील व्याघ्रप्रेमी आपली जंगल सफारी सुरू करू शकतात.

हेही वाचा -National Tourism Day 2022 : जगात एकमेव असणारी वेरूळ लेणी घडवते तीन धर्मांचे दर्शन

निसर्गाने बहाल केलेले स्वर्ग -

टुरिस्ट स्पॉट म्हणून कोका लेक यासोबत तुम्हाला नाईट सफारीचा आंनद घेता येतो. पाटदेव वाघीण, लंगडी वाघीण, न्यू वाघीण, नाला वाघीण, सात ते आठ टायगर या भागात दिसत असल्याचे सांगितले जाते. मध्यप्रदेश मधून तूरिया कर्माझरी, जामतारा आहे. तेच महाराष्ट्रातील खुर्सापार, माणसिंगदेव, चोरबाहुली गेट, कुबाळा गेट हे नागपूर वरून 100 किलोमीटर अंतरावर बस टॅक्सी करून पोहोचुन जंगल सफारी सुरू करू शकते. पेंचपासून 100 किलोमीटरवर पुढे अमोदागढ हे स्थळ जंगल बुकची कहाणी किंवा कथानक याच भागातील परिस्थितीवर लिहण्यात आल्याचे बोलले जात असल्याचे व्याघ्र प्रेमी तथा वाईल्डलाईफ फोटोग्राफर वरुण ठक्कर ( Wildlife photographer Varun Thakkar ) सांगतात. याच भागाला लॅंड ऑफ मोगली ( Land of Mowgli ) असेही म्हटले जाते. त्यामुळे यापूर्वी कधी प्लॅन केला नसल्यास मोगलीचे गाव पाहायला नक्की जा आणि कादंबरीकार रुडयार्ड किपलिंगचे जंगलबुक जंगल सफारीचाही आनंद घ्या...

Last Updated : Jan 25, 2022, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details