नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७ सप्टेंबरला नागपूर दौरा आहे. यामुळे शहरात सुरक्षेसाठी मोठा फौज-फाटा तैनात करण्यात आला आहे. 11 पोलीस उपायुक्तांसह तब्बल 21 कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती, अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्यातील १० कि.मी.चे लोकार्पण करण्यासाठी नागपूला येणार आहेत. यामुळे शहरातील सरक्षा व्यावस्था वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ते अडीच तासांकरता नागपूरला येणार आहेत. या दोन तासांच्या काळात शहरातील अनेक भागातील वाहतूक काही वेळे करता थांबवण्यात येणार आहेत. 22 ठिकाणची वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्यातील १० कि.मी.चे लोकार्पण होणार आहे. या दरम्यान नरेंद्र मोदी हे सुभाष नगर ते सीताबर्डी असा प्रवास मेट्रोने करणार आहेत. यानंतर सीताबर्डी ते मानकापूर इनडोअर स्टेडियमपर्यंत ते वाहनांनी जातील. हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने वाहतूक पोलिसांनी 2 डीसीपी सह 800 कर्मचारी वाहतूक मोकळी करण्यासाठी तैनात केले आहेत.
सुरक्षे दृष्टिकोनातून पोलिसांनी कंबर कसली आहे. सुरक्षेत कुठलीही चूक होऊ नये म्हणूण २१०० पोलीस कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्यामध्ये ११ डीसीपी, २३ एसीपी, ८० पोलीस निरीक्षक, २०० एपीआय आणि पीएसआय यांचा समावेश आहे. नरेद्र मोदी यांची सभा नागपूर इनडोअर स्टेडियम वर होणार असल्याने त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षेचा बंदोबस्त मोठा असणार आहे. सभेला येताना कोणीही कुठलीही वस्तू सोबत आणू नये मात्र मोबाईल फोन तुम्हाला ठेवता येईल, असे आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे. जवळपास अडीच तास पंतप्रधान शहरात राहणार असल्याने पोलिसांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. या सर्व गोष्टींची तयारी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगीतले.