नागपुरात बैलपोळ्यानिमित्त भरला नंदीबैल बाजार - नागपूर
वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलांच्या प्रति सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. त्याचप्रमाणे लहान मुलांना बैलांचे महत्व कळावे यासाठी तान्हा पोळा पूर्व विदर्भात गेल्या दोनशे वर्षांपासून साजरा केला जातो.
nagpur bail bazar
नागपूर - विदर्भात तान्हा पोळ्याच्या सणाला विशेष महत्त्व आहे. बैलपोळ्याच्या पाडव्याला लाकडी नंदीबैलांची मिरवणूक काढली जाते. या उत्सवाला सुमारे दोन शतकांची मोठी परंपरा आहे. नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमागे हा पारंपरिक नंदी बैलपोळा भरला होता. ज्यामध्ये शंभर रुपये ते ५० हजार किमतीचे नंदीबैल विक्रीसाठी उपलब्ध झाले. कोरोनामुळे तान्हा पोळा साजरा करण्यावर निर्बंध लावला असला तरी नंदीबैल खरेदी करण्यासाठी नागरिकांची उत्साहित होते.
१८०६ साली तान्हा पोळा या सणाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. पोळ्याच्या सणाला बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र, या मध्ये लहान मुलांचा देखील सहभाग असावा ता उद्देशाने रघुजी राजे भोसले (द्वितीय) यांना तान्हा पोळा साजरा करण्याची कल्पना सुचली. तेव्हापासून ही परंपरा आजही जपण्यात आली.
हेही वाचा -Belgaum Corporation Results : बेळगाव महापालिकेत फुललं 'कमळ'.. भाजपला स्पष्ट बहुमत, 'एकीकरण'ला धक्का