नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. मतमोजणीतील आकडे आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यात तफावत असल्याचा आक्षेप त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे.
मतमोजणी आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यात तफावत - नाना पटोलेंचा आरोप - Loksabha election
नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे वेबसाईट आणि मतमोजणीतील आकड्यांमध्ये तफावत असल्याची आक्षेप केला. आक्षेपाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर ते मतमोजणी केंद्राबाहेर पडले.
नागपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे वादात अडकली आहे. सुरुवातीला ईव्हीएममधील अनुक्रमांक जुळत नसल्याने गोंधळ झाला. त्यानंतर नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे वेबसाईट आणि मतमोजणीतील आकड्यांमध्ये तफावत असल्याची आक्षेप केला. आक्षेपाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर ते मतमोजणी केंद्राबाहेर पडले. गडकरी यांनी घेतलेल्या आघाडीसंदर्भात त्यांना विचारले ते म्हणाले, आणखी बऱ्याच फेऱ्या शिल्लक आहे. त्यात विजय नक्की होईल, असा विश्वासदेखील त्यांनी बोलून दाखवला आहे.