नागपूर - विदर्भात पारा ४५ अंशावर पोहोचला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता उन्हाळ्यातही वर्ग घेण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अध्ययन क्षमतेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातही भरणार शाळा - नागपूर
अध्ययन क्षमतेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांना यातून पूरक मार्गदर्शन करण्यासंदर्भांत सर्व गतशिक्षण अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वर्ग घेण्यात येणार आहेत.
अध्ययन क्षमतेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांना यातून पूरक मार्गदर्शन करण्यासंदर्भांत सर्व गतशिक्षण अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा झाल्यावर देखील अतिरिक्त होणाऱ्या वर्गात बसावे लागणार आहे. असरच्या धर्तीवर सीआरजी ग्रूपतर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार अध्ययन क्षमता तपासण्यात आली. त्यानुसार नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी जे विद्यार्थी अध्ययनात मागे आहेत, अशा विद्यार्थ्यांना वर्गानुरुप क्षमता प्राप्त करून द्यायची आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.