नागपूर - भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त महिलांची स्कूटर रॅली काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजून आलेल्या महिलांनी रॅलीच्या माध्यमातून १०० टक्के मतदान करण्याचा संदेश दिला.
गुढीपाडवा विशेष: नागपुरात महिलांची स्कुटर रॅली, १०० टक्के मतदान करण्याचा संदेश - पारंपरिक
नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त महिलांची स्कूटर रॅली काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजून आलेल्या महिलांनी रॅलीच्या माध्यमातून १०० टक्के मतदान करण्याचा संदेश दिला.
दरवर्षी भारतीय नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन केले जात. रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. यावेळी पारंपरिक भारतीय परिधनात आलेल्या महिलांनी हिंदू समाजाच्या रुढी-परंपरा आपल्या भावी पिढीला हस्तांतरित करण्यासाठी अशा प्रकारच्या आयोजनाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला हवा हे सांगत १०० % मतदान व्हावे. यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे काम देखील महिलांनी रॅलीच्या माध्यमातून केले.