नागपूर - शासन आणि प्रशासन कितीही दावे-प्रतिदावे करत असले तरी लॉकडाऊनमुळे हजारो कामगारांपुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्या सर्व कामगार आणि मजुरांच्या मदतीसाठी नागपुरातील प्रसिद्ध साई मंदिर पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हिंगणा परिसरातील हजारो कामगारांना दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचा उपक्रम साई मंदिर संस्थानाकडून राबवला जात आहे.
नागपूर; साई मंदिराकडून दररोज 7 हजार लोकांना घरपोच जेवणाची व्यवस्था
लॉकडाऊनच्या काळात हिंगणा परिसरातील हजारो कामगारांना दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचा उपक्रम साई मंदिर संस्थानाकडून राबवला जात आहे.
एवढंच नाही तर, शहरातील इतर भागात ऑन डिमांड जेवणाची मागणी केली जाते, त्या ठिकाणी जेवण पुरवण्याचे कामदेखील केले जात आहे. या शिवाय मेयो आणि मेडिकलमध्ये भर्ती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची जबाबदारीसुद्धा साई मंदिराने घेतली आहे. दिवसाला 5 हजार लोकांसाठी सकाळी आणि रात्री जेवणाची व्यवस्था केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हजारो मजुरांचे पलायन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर साई मंदिर संस्थेच्या माध्यमातून कामगारांना जेवण दिले जात आहे. याशिवाय 31 लाख रुपयांचा निधी देखील साई मंदिराकडून मुख्यमंत्री मदत खात्यात जमा करण्यात आला आहे.