महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2019, 7:48 AM IST

Updated : Oct 8, 2019, 8:56 AM IST

ETV Bharat / city

संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात; रेशीमबागेत पथसंचलनाला आरंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला सुरुवात झाली असून शहरातील रेशीमबाग मैदानातून स्वयंसेवकांच्या पथसंचलनाने संघाच्या पारंपरिक कार्यक्रमाचा आरंभ झाला आहे. या कार्यक्रमाला एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात झाली आहे.

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला सुरुवात झाली असून शहरातील रेशीमबाग मैदानातून स्वयंसेवकांच्या पथसंचलनाने संघाच्या पारंपरिक कार्यक्रमाचा आरंभ झाला आहे. या कार्यक्रमाला एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संघाच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पथसंलनाला पोहोचले असून, काहीच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री व्ही.के.सिंग यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित असणार आहेत.

हेही वाचाविजयादशमी : चंदीगडमध्ये होणार देशातील सर्वांत मोठ्या रावणाच्या पुतळ्याचे दहन

परंपरेनुसार सरसंघचालक मोहन भागवत यावेळी शास्त्रपूजा करून उपस्थितांना संबोधित करतील. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर संघाचा हा पहिलाच विजयादशमी उत्सव असल्याने सरसंघचालक काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 8, 2019, 8:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details