महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुर : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिल्ली दरबार, फूड गॅरेज, द जेलर किचन या हॉटेल्स आणि धाब्यावर पोलीस विभागाच्या मदतीने कारवाई केली. मद्यप्राशन करणाऱ्यांवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कारवाई

By

Published : Nov 14, 2019, 11:26 AM IST

नागपुर - शहरातील नामांकित हॉटेल्स आणि सावजी खानावळीत अनाधिकृतपणे मद्यसेवा पुरवली जात असल्याच्या तक्रारींचा ओघ राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाकडे वाढला आहे. त्यानंतर या दोन्ही विभागांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान ३ हॉटेल मालकांसह १५ मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कारवाई

हेही वाचा -नागपूरमध्ये गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिल्ली दरबार, फूड गॅरेज, द जेलर किचन या हॉटेल्स आणि धाब्यावर पोलीस विभागाच्या मदतीने कारवाई केली. यावेळी सार्वजनीक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर व सेवा देणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्यप्राशन करणाऱ्यांवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details