नागपूर -इथर ट्रेड एशिया कंपनीच्या नावाने शेकडो लोकांची 40 कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिकला नागपूर पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. आरोपी निशीद वासनिकने अवघ्या एका वर्षात दोन हजार पेक्षा जास्त जणांना डिजिटल करंन्सीच्या नावावर फसवणूक केल्यानंतर पसार झाला होता. नागपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे लोणावळ्यातून अटक केली आहे. पोलिसांनी निशिदकडून चार लक्झरी गाड्या, एक पिस्तूल, काही जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने, मोबाइल, रोख रक्कम यासह 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निशीद वासनिकने पुण्यातील काही गुन्हेगारांच्या संरक्षणात लोणावळा या ठिकाणी एका डुप्लेक्समध्ये लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पहाटे दोन वाजता नागपूर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने लोणावळा येथील त्याचे डुप्लेक्सवर छापा मारला आणि निशिद वासनिक, त्याची पत्नी प्रगती वासनिक, हत्या प्रकरणातील आरोपी संदेश लांजेवार आणि गजानन गुणगुणे यांच्यासह एकूण अकरा जणांना अटक केली आहे.
- रक्कम चौपट करण्याचे दिले होते आश्वासन
निशीद वासनिकने त्याचा सहकारी महादेव पवार याच्यासोबत मिळून इथर ट्रेड एशिया नावाने ऑनलाइन प्लॅटफॉर्म (वेबसाईट) तयार केले होती. इथर म्हणजेच डिजिटल करेन्सीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत रक्कम चौकट करता येते, असे आमिष दाखवून त्याने गुंतवणूकदारांकडून तब्बल 40 कोटी रुपये गोळा केले होते. मात्र गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर तो एप्रिल 2021 पासून फरार झाला होता. नागपूर पोलिसांनी 17 एप्रिल 2019 रोजी निशिद आणि त्याच्या साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला होता.
- सहकाऱ्याची केली हत्या