नागपूर :- लग्न समारंभात विविध विधी पूर्ण करण्यात व्यस्त असलेल्या कुटुंबीयांच्या महागड्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या चार महीलांच्या टोळीला दागिने लंपास करताना लग्नातील वऱ्ड्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी चार महिलांना अटक केली आहे.
Nagpur Crime : महिलांच्या अट्टल टोळीला लोकांनी पकडले - नागपूर पोलिसांनी पकडले महिला टोळीला
लग्नात महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरांची टोळी सराईत गुन्हेगार आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने त्या एखाद्या महिलेला हेरून दागिने लंपास करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
रेखा कापसे नामक एक महिला कामठी येथे एका लग्न सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. लग्नातील गर्दीचा गैरफायदा घेऊन एक महिला चोर रेखा कापसे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करण्याचा प्रयत्न करत होती. ही बाब त्यांच्या लक्षात येताच रेखा कापसे यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे महिला चोरांचा बेत फसला. मात्र, लग्नात उपस्थित लोकांनी दागिने चोरण्याच्या प्रयत्नात अडलेल्या मालती लोंढेसह सुवर्णा पात्रे, अरुणा खंडारे आणि एका महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
अटक महिला सराईत चोर:-
लग्नात महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरांची टोळी सराईत गुन्हेगार आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने त्या एखाद्या महिलेला हेरून दागिने लंपास करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. पुढील प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा -Nishid Wasnik Arrested : मोस्ट वॉन्टेड निशीद वासनिकला नागपूर पोलिसांनी केली अटक; दोन हजारपेक्षा अधिक लोकांची केली आर्थिक फसवणुक