महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - Haribhau Bagde BJP take Interviews

आगामी विधानसभेसाठी नागपूर शहराच्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांसाठी हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत.

नागपूर शहराच्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखती

By

Published : Aug 31, 2019, 12:25 PM IST

नागपूर -विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. बागडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कोअर कमिटीमार्फत 'रवी भवन' येथे या मुलाखती घेतल्या जात आहेत.

हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

नागपुरात 6 जागांसाठी एकुण 80 इच्छुक उमेदवार

नागपुरात विधानसभेच्या शहरातील 6 जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या जात आहेत. नागपूर शहरातील 6 विधानसभा जागांसाठी भाजपाकडून सुमारे 80 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा... भाजपकडून राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागांसाठी चाचपणी सुरू - सुधीर मुनगंटीवार

हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कोअर कमिटीमार्फत 'रवी भवन' येथे या मुलाखती घेतल्या जात असुन या कोअर कमिटीच्या बैठकीत हरिभाऊ बागडे यांच्यासह नागपूर भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व आमदार, सर्व मंडळ प्रमुख, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष हे आहेत.

हेही वाचा... आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्र्यांच्या शहरात​​​​​​​

हेही वाचा... नागपूर: उपमुख्यमंत्री होणार की नाही, या विषयाचा पेपर मी फोडणार नाही- आदित्य ठाकरे​​​​​​​

ABOUT THE AUTHOR

...view details