महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर-जबलपूर महामार्गावर ९७ लाखांची ६० टन सुपारी जप्त - betel nut seized

रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात नागपूर-जबलपूर महामार्गावर पोलिसांनी 97 लाख किमतीची एकूण 60 टन सुपारी जप्त केली आहे.

नागपूर-जबलपूर महामार्गावर ९७ लाखांची ६० टन सुपारी जप्त

By

Published : Aug 25, 2019, 3:12 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील देवलापार पोलिसांनी शनिवारी रात्री नागपूर-जबलपूर या महामार्गावर 97 लाख किमतीची सुपारी जप्त केली आहे. दोन ट्रकमध्ये साधारणतः 60 टन सूपारी पोलिसांना आढळून आली.

नागपूर-जबलपूर महामार्गावर ९७ लाखांची ६० टन सुपारी जप्त

सुपारीच्या तस्करीबाबत पोलिसांना माहीत मिळताच, देवलापार पोलिसांनी सापळा रचला आणि नागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रकची तपासणी केली. ही तपासणी करत असताना पोलिसांना दोन ट्रकमध्ये 60 टन सुपारी आढळून आली. साधारणतः 97 लाख किमतीची ही सुपारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून नागपुरात या सुपारीची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच ही सुपारी चोरीची असल्याची शंकाही पोलिसांना येत आहे. हे 2 ट्रक आणि त्यांच्या चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रक मालक आणि सुपारी कोणाची आहे, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details