महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धावत्या मेट्रोत थिल्लरपणा; राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांच्यावर पक्षाकडून कारवाईचे संकेत

धावत्या मेट्रो रेल्वेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जुगार खेळणे आणि अश्लील नृत्याचे आयोजन करून थिल्लरपणा केल्या प्रकार समोर आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि सहकाऱ्यांविरुद्ध अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

party leader Prashant pawar
राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांच्यावर पक्षाकडून कारवाईचे संकेत

By

Published : Jan 28, 2021, 12:00 PM IST

नागपूर- धावत्या मेट्रो ट्रेन मध्ये जुगार खेळणे आणि अश्लील नृत्य घडवून आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्यांच्यावर कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत.

प्रशांत पवार यांनी मेट्रो मध्ये केलेल्या अशोभणीय वर्पनामुळे समाजातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली गेली आहे. त्यामुळे प्रशांत पवार यांच्यावर कठोर कारवाई केली जावी या करिता राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांनी सुचवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी प्रशांत पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्रशांत पवार यांच्यावर पक्षाकडून कारवाईचे संकेत

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

धावत्या मेट्रो रेल्वेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जुगार खेळणे आणि अश्लील नृत्याचे आयोजन करून थिल्लरपणा केल्या प्रकार समोर आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि सहकाऱ्यांविरुद्ध अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात महामेट्रोकडून तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घडलेल्या घटनेची माहिती -

धावत्या मेट्रोत केवळ तीन हजार रुपये खर्च करून कुणाला ही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसासह अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाते. असाच एक कार्यक्रम २० जानेवारी रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. या मध्ये अक्षरशः क्लब भरवण्यात आला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी चक्क जुगार खेळला असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. एवढच काय तर आयोजकांनी तृतीयपंथीनकडून नृत्य देखील करवून घेतले होते. तर लोकांनी अक्षरशः या नृत्यावर पैसे उडविले होते. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details