नागपूर -या वर्षी नागपूर महानगरपालिका तब्बल २०० ई-बसेस ( eco friendly electric mini buses ) खरेदी करणार आहे. एवढेच नाही तर, पुढच्या वर्षी देखील २०० पेक्षा अधिक ई बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी दिली आहे. यावर्षी खरेदी करण्यात येणाऱ्या २०० पैकी २५ ई-बस ( electric mini buses ) खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील आठवड्यात या बसेस सेवेत समाविष्ट होणार आहेत. नवे इकोफ्रेंडली तंत्रज्ञान ( eco friendly Technology ) त्याचबरोबर आरामदायक स्वरूपात या बसेस असणार आहेत.
Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिका 200 ई-बस खरेदी करणार - महापालिका आयुक्त
नागपूर शहराची ( City of Nagpur ) लोकवाहिनी असलेली मनपा संचालित "आपली बस" आता लवकरच नवे तंत्रज्ञान आणि स्वरूपात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. नव्या १५९ ई-बसेस ( electric mini buses ) लवकरच जुन्या बसेसची जागा घेतील. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण १४४ ई बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे ( Nagpur Municipal Corporation ) आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी ( Commissioner Radhakrishnan b ) यांनी दिली आहे.
हिरवळीसाठी प्रसिद्ध नागपूर शहराला प्रदूषणाच्या ( Pollution of Nagpur city ) विळख्यातुन मुक्त करण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे पर्यावरणपूरक अशा २५ इलेक्ट्रिक मिनी बस ( 25 eco friendly electric mini buses ) खरेदी करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यापूर्वी १५ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्स सोबत करार करण्यात आला आहे. आता यामध्ये आणखी २५ ई- बसेसची भर पडणार आहे. बस खरेदी करण्यासाठी ३५ कोटीच्या प्रस्तावाला सुद्धा संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
१४ व्या वित्त आयोगातून बसेस खरेदी करणार -शहराची लोकवाहिनी असलेली मनपा संचालित "आपली बस" आता लवकरच नवे तंत्रज्ञान आणि स्वरूपात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. नव्या १५९ ई-बसेस लवकरच जुन्या बसेसची जागा घेतील. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण १४४ ई बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी दिली आहे.
हेही वाचा -CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा