नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या के.टी. नगर रुग्णालयात आठवड्याभरापासून कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पण १०० खाटांच्या रुग्णालयासाठी ऑक्सिजनची सोय उपलब्ध होत नसल्याने काम रखडले होते. मात्र आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून २५ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था झाल्याने काही अंशी प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात 100 खाटांचे रुग्णलाय सुरू होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
मनपाचे 100 खाटांचे रूग्णालय तयार; आमदार दटकेंच्या प्रयत्नाने मिळाले ऑक्सिजन सिलेंडर
के.टी. नगरच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी डॉक्टर्स, नर्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा व्यवस्था झाली आहे. यावेळी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करण्यात आली.
के.टी. नगरच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी डॉक्टर्स, नर्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा व्यवस्था झाली आहे. यावेळी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात आणखी 25 सिलेंडर मिळताच रुग्णलय कार्यान्वित होणार आहे. यात मनपाचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी ऑक्सिजन सिलेंडरसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा मागणी केली होती. मात्र मार्ग न निघाल्याने अखेर आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न सोडवत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. यावेळी माजी मंत्री डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे हे उपस्थित होते. मागील काही दिवसात वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीमुळे सिलेंडर मिळण्यास अडचण होत आहे. मनपा आणखी काही रुग्णालय सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.