नागपूर -उपराजधानी नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या कहर पाहता तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी मनपा आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेचा अनुभवानंतर गृह विलगीकरण बंद करत आतापासून इन्स्टिटय़ूशनल विलगीकरणात पहिल्या टप्प्यात तब्बल 400 बेडचे नियोजन केले. यासह महत्वाचे पाऊले उचलत उपाययोजना केल्या असल्याचा आढावा घेतला ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने....
Omicron Variant : नागपूर मनपाचा ओमायक्रॉन रोखण्यासाठी 'हा' फार्म्युला
नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Muncipal Corporation) ओमायक्रॉन (Omicron Variant) या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे नव्याने मिळणाऱ्या रुग्णाला इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन (Institutional Quarantine) करण्याचा निर्णय घेतला आहे.
गृहविलगीकरण बंद करणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मोथुन शहरांना मागे टाकत दररोज 5 ते 7 हजार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे चित्र राहिले आहे. त्यानंतर परिस्थिती सामान्य होताना रुग्णसंख्या घटली आहे. मागील दोन ते तीन महिन्यात रुग्ण संख्या कमीच आहे. सध्याच्या घडीला केवळ 40 पॉझिटिव्ह रुग्ण आहे. पण ओमायक्रॉनमुळे आता नव्याने मिळणाऱ्या रुग्णांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गृहविलगीकरण बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे.
विलगीकरणासाठी हे असणार ठिकाण
इन्स्टिट्यूशनल विलगीकरण्यासाठी आमदार निवास ताब्यात घेतले आहे. मिहानमधील एम्स हॉस्पिटल आणि नागपूर मनपाचे इंदीरा गांधी रुग्णालयात सर्व मिळून साधारण 400 वर बेडचे नियोजन केले आहे. गरजेनुसार वाढवले जाईल. पण बायबरोड किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपाययोजना केल्या जातील. त्या संदर्भात लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.